DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

संतापजनक : अल्पवयीन मतिमंद मुलीवर अत्याचार करून केले गर्भवती ; अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा

पाचोरा :– १६ वर्षीय अल्पवयीन मतीमंद मुलीवर अनोळखी आरोपीने अत्याचार करीत तिला ५ महिन्याची गर्भवती केल्या प्रकरणी पिंपळगाव(हरे.) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा तालुक्यातील एका गावात ४० वर्षीय वडील आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. ते परिसरातील शेतात मजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. दि. १६ मे २०२३ रोजी पासून ते दि. १६ ऑक्टोबर २०२३ या दरम्यान ते नियमित मजुरी कामासाठी जात असतांना त्यांच्या घरी १६ वर्षीय मतीमंद मुलगी हि घरीच असायची याच वेळी संशयित आरोपीने तिच्या मतीमंद असल्याचा फायदा घेत मुलीसोबत चुकीचे कृत्य करून तिला ५ ते ६ महिन्याचे गर्भवती केल्याची प्रकार उघडकीस आला आहे. ज्यावेळेस मुलीच्या पोटाचा घेर वाढू लागला त्यावेळी मुलीच्या पालकांनी तिला जळगाव शहरातील सरकारी रुग्णालयात तपासणी करण्यासाठी आणले असतांना त्यांना हि घटना समजल्यावर धक्काच बसला. त्यानंतर त्यांनी लागलीच पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरे.) पोलिसात दि.१७ ऑक्टोबर रोजी धाव घेत अनोळखी संशयित आरोपी विरोधात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार हे करीत आहेत.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.