DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

घरगुती वादातून प्रौढाला लोखंडी रॉडने मारहाण

गुन्हा दाखल : दोन नातेवाइकांशी वाद

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील रामेश्वर कॉलनीत घरगुती वादातून प्रौढाला त्याच्या नातेवाईक असलेल्या दोघांनी लोखंडी रॉड मारून दुखापत केल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी दोघांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

शहरातील रामेश्वर कॉलनीत राजेंद्र चौधरी (वय ४८) हे वास्तव्यास आहेत. रामेश्वर कॉलनीतच राहणाऱ्या त्यांच्या दोन नातेवाईकांसोबत घरगुती वाद आटे या वादातून दोघांनी शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास राजेंद्र चौधरी यांच्यासोबत भांडण करत त्यांच्या नाकावर लोखंडी रॉड मारून दुखापत केली, तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर शनिवारी रात्री साडेअकरा वाजता जखमी राजेंद्र चौधरी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून दोन जणांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय धनगर हे करीत आहेत.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.