DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

खासगी बस उलटून झालेल्या अपघात दोन जणांचा मृत्यू

जळगाव ;- राजस्थानकडून जळगावमार्गे एका खासगी बस उलटल्यामुळे दोन जण ठार झाल्याची घटना आज सकाळी एरंडी;ल तालुक्यातील पिंपळकोठा गावाजवळ महामार्गावर घडली . यात १० ते बारा प्रवासी जखमी झाले.

दीपेंद्र कुमार (वय २५), बलराम (वय ३३), दिनेश कुमार (वय ३०), रतनलाल कुमावत (वय ४०), जयराम कुमार (वय ३२), महादेव कुमार (वय ४५), अनोळखी (वय ३०), अनोळखी हे गंभीर झाले आहेत तर राजेंद्र प्रजापती (वय ४५), सीताराम कुमार (वय ३५), मुकेश गुजर, लक्ष्मी जांगीड (वय ५०)  हे किरकोळ जखमी आहेत. तर मृत चालकाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही.  जखमींवर एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींपैकी तीन जणांना जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.बस ही श्री चौधरी ट्रॅव्हल्स या कंपनीची होती

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.