DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

बँकींग (IBPS) परीक्षांच्या मार्गदर्शन वर्गासाठी ऑनलाईन अर्ज मागविले

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराअंतर्गत अनुसूचित जातीच्या ७५ विद्यार्थ्यांसाठी बँकींग (IBPS) परीक्षांच्या मार्गदर्शन वर्गासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.

बँकींग परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी बार्टीकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासाठी विद्यापीठ आणि बार्टी पुणे यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. अनुसूचित जातीच्या ७५ विद्यार्थ्यांसाठी बँकींग (IBPS) परीक्षांच्या मार्गदर्शन वर्गासाठी दि. ४ नोव्हेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील. या अर्जांची लिंक http://bati.live/barti/ibps/login आहे. सदर अर्ज हे. सविस्तर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी 0257-2257411 किंवा 9420675602, 9561108747, 9561602749 या क्रमांकावर संपर्क साधावा. अशी माहिती संचालक डॉ. अजय सुरवाडे यांनी दिली.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.