DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगावात घरफोडी ; ४४ हजारांचा मुद्देमाल लांबविला

जळगाव ;- येथील प्रजापत नगर परिसरातील पवन नगर येथे अज्ञात चोरटयांनी घरफोडी करून घरातील ४४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छायाबाई भटू बडगुजर (वय ४४, रा. पवननगर, जळगाव) असे फिर्यादीचे नाव आहे. त्या अष्टविनायक गणपतीच्या दर्शनासाठी मुलीसोबत २९ सप्टेंबर रोजी गेल्या होत्या. तेव्हापासून ते ३ ऑक्टोबर पर्यंत केव्हातरी चोरटयांनी फिर्यादी यांचे बंद घर पाहून तेथे घरफोडी केली. दागिने, मोबाईल असा ४४ हजार ५०० रुपयांचा ऐवज लांबविला. फिर्यादी परत आल्या तेव्हा त्यांना घराचा कडीकोंयडा तुटलेला दिसला. त्यांनी आत जाऊन पहिले असता त्यांना घरफोडी झाल्याचे दिसुन आले.

त्यांनी तात्काळ पोलिसांना कळविले. फिर्यादीच्या तक्रारीनुसार तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउनि माणिक सपकाळे करीत आहे. चोरटयांनी परिसरातील विश्राम नगरातील पुंडलिक अपार्टमेंट येथे संदीप सुधाकर जोशी यांचेकडे देखील घरफोडी केली आहे. मात्र तेथील किती ऐवज चोरीला गेला, ते कळू शकले नाही.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.