DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

चाळीसगाव एमआयडीसीतून २२ लाखांचा गुटखा पकडला ; एकाला अटक

चाळीसगाव ;- येथील एमआयडीसी परिसरात असणाऱ्या एका गोडाऊन मधून अन्न औषध विभाग आणि चाळीसगाव शहर पोलिसांनी २२ लाख ४१ हजारांचा गुटखा पकडला असून यात एकाला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, एमआयडीसी चाळीसगाव परिसरातील छत्रपती दुध शितकरण केंद्राचे समोर, प्लॉट नं 27 ए स्थित गोडावुन, जि. जळगाव येथे अवैध रित्या प्रतिबंधीत गुटखा साठवणुक करुन विक्रीकामी आणल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनास प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी अविनाश दाभाडे,अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार, , अन्न व औषध प्रशासन, जळगांव यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनची मदत मागितली असता, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड व पथकाला तात्काळ सहकार्य करण्याचे आदेश दिले होते.

 

. पथकाने गोडावूनवर सायंका ळी 17.15 वाजेचे सुमारास छापा टाकला असता, गोडावूनमध्ये आरोपी = दत्तु लालदास बैरागी, वय 29 वर्षे, रा. सिंधी कॉलनी, इंदिरा गांधी सिंधी शाळेजवळ, चाळीसगाव, जि. जळगाव याला ताब्यात घेऊन केसरयुक्त विमल पान मसाला 10 रुपये विक्री किमतीचे एकुण 26 सुती पोते, , V1 सुगंधित तंबाखुचे एकुण 5 पोते, केसरयुक्त विमल पानमसाला 20 रुपये विक्री किमतीचे एकुण 25 सुती पोते व V1 सुगंधित तंबाखुचे एकुण 6 पोते असा एकुण 22,41,800/- रुपये किमतीचा साठा अवैधरित्या कब्जात बाळगतांना मिळून आला.

प्रतिबंधीत केलेला अन्नपदार्थ, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला विमल पानमसाला विना परवाना विक्रीच्या उद्देशाने स्वताचे कब्जात बाळगतांना मिळुन आला म्हणुन नमुद आरोपी विरुध्द चाळीसगांव शहर पो.स्टे. गु.र.नं. 393/2023 भा.द.वि.कलम 328, 188,272,273 सह अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006 चे कलम 26(2)(4), सहवाचा कलम 3 (1)(z)(v) (अ) शिक्षा कलम 59 तसेच कलम 26 (2)(4) सहवाचा अन्न सुरक्षा आयुक्त यांचे दिनांक 15 जुलै 2022 चे आदेश, कलम 27 (3)(डी) कलम 27(3)(इ) शिक्षा कलम 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीतास अटक करुन सदरचा माल हा जप्त करण्यात आला आहे. सदर गोडावूनमध्ये शालेय पोषण आहाराचे तांदुळ, तेल ,मिठ ,दाळ इ.मालसुध्दा मिळून आल्याने त्याबाबत गट विकास अधिकारी, पंचायत समिती,चाळीसगाव यांना कळवण्यात आले आहे .

यांनी केली कारवाई

समाधान पवार, सह आयुक्त (दक्षता) अन्न व औषध प्रशासन म.रा. मुंबई, संजय नारागुडे, सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, नाशिक विभाग, मा. पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, सहा. पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश दाभाडे, अन्न सुरक्षा अधिकारी, गुप्तवार्ता, अन्न व औषध प्रशासन, नाशिक, शरद पवार, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, जळगांव यांच्यासह पोलीस निरीक्षक, संदीप पाटील, तसेच पोउपनि/सुहास आव्हाड, पोहेकॉ/योगेश बेलदार, पोना/पंढरीनाथ पवार, पोना/विनोद भोई, पोना/दिपक पाटील, पोना/तुकाराम चव्हाण, पोकॉ/निलेश पाटील, प्रविण जाधव, विनोद खैरनार, नंदकिशोर महाजन, अमोल भोसले, शरद पाटील, मोहन सुर्यवंशी व गणेश कुवंर सर्व. नेम चाळीसगांव शहर पो.स्टे. यांनी संयुक्त अभियान राबवुन केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास PSI सुहास आव्हाड व पोकॉ/उज्वलकुमार म्हस्के नेम. चाळीसगांव शहर पो.स्टे. हे करीत आहेत.

चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी सन 2023 मध्ये एकुण आजपावेतो प्रतिबंधीत गुटखा संदर्भात 04 फौजदारीपात्र गुन्हे दाखल केले असून त्यांत 6 आरोपीतांना अटक करुन, त्यांचेकडून एकुण 1 कोटी 31 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.