जुन्या भांडणाच्या कारणावरून एकावर चॉपरने वार ; दोघांवर गुन्हा
जळगाव ;- चहाच्या दुकानदाराला जुन्या भांडणाच्या कारणावरून शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन जणांनी चॉपरने वार करून जखमी केल्याची घटना घडली असून याप्रकरणी गुरूवार १० ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील कौतीन नगरात मनिष उर्फ गोट्या मगन पाटील (वय-३३) हा तरूण राह्यला असून त्याचे जळगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चहाचे दुकान आहे. ९ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून खेडी येथील शंकर मराठे, गणेश चौधरी यांनी चॉपरने वार करून दुखापत कली. जखमी झालेल्या मनिष पाटील याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचरार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे करीत आहे.