DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच विनयभंग: तरूणास अटक

भडगाव : तालुक्यातील गिरड येथे दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच एकाने विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघडली आहे. याप्रकरणी पोलिसात एका तरूणा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी योगेश अशोक पाटील यांस पिंपरखेड येथे अटक करण्यात आली आहे.

या संदर्भात पिडीत अल्पवयीन विद्यार्थिनीने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले की, पीडिता इयत्ता १० वी बोर्डाचे पेपर देण्यासाठी जात असतांना संशयित आरोपी तरुण हा १ मार्चपासून सतत पाठलाग करत होता. तर दि. १५ मार्च रोजी त्याने पिडीतेला मी तुझ्यावर प्रेम करतो. तू का करत नाही, असे म्हणाला. तसेच पिडीतेचा हात धरुन बोलला की तू मला ध्यानात ठेव. मी तुला बघून घेईल अशी धमकी देवून वर्गातून निघून गेला. एवढेच नव्हे तर संशयित आरोपी याने हात धरुन प्रेम करण्यासाठी बळजबरी करुत पिडीतेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. याप्रकरणी भडगांव पो.स्टे. ला गुरन ७४ / २०२३ अन्वये भादवी कलम ३५४, ३५४ (ड), बाल लैगीक अत्याचार कायदा २०१२ चे कलम ११/१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.