DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

डबल भेजा, गुड्डान दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार

जळगाव :- जळगांव शहर पो.स्टे. कडील टोळीने गुन्हे करणारे गुन्हेगार जुबेर उर्फ डबल भेजा भिकन शेख (वय २२, रा. गेंदालाल मिल, जळगांव) आमीर उर्फ गुडन शेख महमद (वय २०, रा गेंदालाल मिल, जळगांव) यांचेविरुद्ध जळगांव शहर पो.स्टे. ला एकूण १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
या दोघांच्या हद्दपारचा प्रस्ताव शहर पोलिसांनी सादर केला होता. त्यांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

दोन्ही गुन्हेगार हे टोळीने राहून जळगाव शहरासह विविध ठिकाणी आपल्या गुन्ह्यांची दहशत वाजवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करीत असल्याने त्यांच्यावर वचक निर्माण व्हावा यासाठी हद्दपार करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. जळगाव शहराची शांतता कायदा व सुव्यवस्था चांगली ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर हद्दपारी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. डबल भेजा आणि गुड्डन या दोन अटल गुन्हेगारांच्या हदपार प्रस्ताव हा जळगांव शहर पो.स्टे.चे पो.निरी. अनिल भवारी, याशीर तडवी, पोहेकॉ विनय निकुंभ, पोहेकॉ भास्कर ठाकरे, पोकॉ अमोल ठाकुर, पोना प्रफुल धांडे यांनी तयार करून पोलीस अधीक्षक यांचेकडेस सादर केला होता. पोलीस अधीक्षकांनी दोघांना हद्दपार केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी व त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार सफौ युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल दामोदरे यांनी पुढील कारवाई केली.

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.