DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

मुक्ताईनगर बोदवड APMC वर एकनाथ खडसेंची सत्ता

जळगाव : जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले होते. आज जळगाव, अमळनेर, पाचोरा, बोदवड, यावल, धरणगाव या ६ बाजार समित्यांची मतमोजणी होत आहे. यामध्ये बोदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादी प्रणीत पॅनलने दणदणीत विजय संपादन केला असून यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.

 

राष्ट्रवादीच्या पॅनलने १८ पैकी तब्बल १७ जागा जिंकून दणदणीत विजय संपादन केला आहे. तर महायुतीच्या पॅनलला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. या विजयामुळे एकनाथराव खडसे यांना मोठा दिलासा मिळाला असून आमदार चंद्रकांत पाटील यांना धक्का बसला आहे.

जळगावात १८ पैकी ११ जागांवर ‘मविआ’ विजयी

जळगाव बाजार समितीत महाविकास आघाडी ११, महायुती ६, अपक्ष १ उमेदवार विजयी झाले आहेत. यामुळे अगदी प्रतिष्ठेची करण्यात आलेल्या या निवडणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पराभवाचा धक्का बसला आहे तर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने विजय संपादित केला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या महाविकास आघाडीला 11 जागा मिळाल्या आहेत. तर सहा जागांवर शिंदे भाजपा निवडून आले आहेत. एक जागा ही अपक्ष म्हणून निवडून आली आहे.

 

बाजार समिती निवडणूक ही मिनी विधानसभा निवडणूक म्हणून ओळखली जाते कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे मतदान असते अशावेळी या निवडणुकीमध्ये बसलेल्या फटक्यामुळे येत्या काळात जळगाव तालुकामध्ये गुलाबराव पाटील यांना संघर्ष करावा लागणार हे नक्की झाले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने या निवडणुकीमध्ये अनपेक्षित रित्या घवघवीत यश मिळवले आहे. महाविकास आघाडी विरोधात महायुती अशी ही निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी ने आपल्या पदरात ११ जागा निवडून आणल्या आहेत तर महायुतीला म्हणजेच शिंदे-भाजपला जोरका धक्का देत त्यांना केवळ सहा जागी निवडून येता आले आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.