DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

धरणगाव बाजार समितीवर सहकार पॅनलचे वर्चस्‍व

जळगाव : धरणगाव बाजार समितीवर अटीतटीच्या लढतीत एक हाती सत्ता मिळवण्यात शिंदे भाजप (BJP) गटाला यश मिळालं आहे. शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी १८ पैकी १२ जागांवर मोठा विजय मिळवत वर्चस्व सिध्द केले आहे

 

 

धरणगाव बाजार समितीवर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार पॅनलने १८ पैकी १२ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. तर राष्ट्रवादीच्या माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलला केवळ सहा जागांवर विजय मिळवता आला आहे.

एक हाती विजय मिळवल्यानंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. ढोल ताशाच्या गजरावर तसेच गुलाबाची उधळण करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळाले. धरणगाव बाजार समितीवर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या भाजप-शिंदे गटाच्या सहकार सहकार पॅनलने वर्चस्व प्रस्थापित केला आहे. भाजप-शिंदे गटाला या ठिकाणी राष्ट्रवादीचे बंडखोर संजय पवार यांच्या गटाचाही पाठिंबा मिळाला होता. याच राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर धरणगाव बाजार समितीवर भाजप शिंदे गटाने सत्ता प्रस्थापित केली आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.