14 वर्षीय मुलीला फुस लावून पळविले
एरंडोल; –तालुक्यातील पिंपळकोठा बुद्रुक येथून एका 14 वर्षीय मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत उघडकीस आली. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला संशयित तुषार कैलास भील याच्या विरोधात पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिल्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की पिंपळकोठा येथील रहिवासी असलेल्या 14 वर्षीय मुलीला संशयित तुषार कैलास भील याने पळवून नेल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी दिल्यावरून एरंडोल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोलीस उपनिरीक्षक शरद बागल करीत आहे.