१२ वर्षीय मुलाचे यावल शहरातून अपहरण
यावल:– शहरातील बुरुज चौकातून एका बारा वर्षे मुलाने बूट विकत घेतल्यानंतर तो परत न आल्याने अज्ञात व्यक्तीने त्याला फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद पीडित मुलाच्या वडिलांनी दिल्यावरून यावल पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की तालुक्यातील दहिगाव येथे शेतमजुरी करणाऱ्या एका व्यक्तीच्या बारा वर्षीय मुलाने 30 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास यावल शहरातील बुरुज चौकामधून स्वतःसाठी शूज खरेदी केल्यानंतर तो १ ऑक्टोबर पर्यंत घरी परत न आल्याने त्याचा सर्वत्र शोध घेतला असता पीडित मुलाच्या वडिलांनी यावल पोलीस स्टेशनला धाव घेऊन अज्ञात व्यक्ती विरोधात दिल्यावरून 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास विजय पाच पोळे करीत आहे.
