DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

फार्मर ते ट्रान्सफार्मर’ प्रेरणादायी प्रवास..!

शेतकऱ्यांनी उलगडला कृषिविकासाचा पट

जळगाव | प्रतिनिधी

फार्मसीचे शिक्षण होऊन औषधालय सुरू केले. यातून जनसंपर्क वाढला. आपल्या शिक्षणाचा, जनसंपर्काचा विधायक कार्यासाठी उपयोग व्हावा याच उद्देशाने स्वत: बरोबर इतरही पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविणारा ‘फार्मर ते ट्रान्सफार्मर’ हा अत्यंत प्रेरणादायी प्रवास शिरपूर तालुक्यातील प्रगतशील युवाशेतकरी पद्माकर पाटील यांनी फालीच्या विद्यार्थ्यांसमोर आपला कृषिविकासाचा पट उलगडून दाखविला.

 

जैन हिल्सच्या आकाश मैदानावर झालेल्या या सुसंवाद कार्यक्रमात स्वप्नील प्रकाश महाजन, (वाघोदा ता. रावेर), प्रविण पाटील (महेलखेडी,ता.मुक्ताईनगर), गणेश तराळ, (अंतुर्ली ता. मुक्ताईनगर), अतुल उल्हास चौधरी (सांगवी, ता. यावल), प्रमोद बोरोले (साक्रीफेकरी ता. भुसावळ), योगेश्वर पाटील (दापोरा बुऱ्हाणपूर) या शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. फाली विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तर स्वरूपात आपल्या कृषिज्ञानात भर पडेल अशा बाबी जाणून घेतल्या. यावेळी प्रायोजकत्व स्वीकारलेल्या कंपनी प्रतिनिधींदेखील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. फालीच्या तिसऱ्या टप्प्यात पहिल्या दिवशी जैन इरिगेशनच्या शेती संशोधन केंद्रावरील प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी बघितले. यात फ्युचर फार्मिंग, एरोपोनिक, हायड्रोपोनिक, जैन स्विट ऑरेंज, अति सघन पद्धतीने लागवड केलला आंबा, पेरू व अन्य फळबागांची भेट दिली. प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी शेतावर जाऊन माहिती घेतली.

आज कृषि बिझनेस मॉडेल व इन्होव्हेशनचे प्रदर्शन
गत १ जून पासून तिन टप्प्यात पार पडत असलेल्या फालीच्या नवव्या संमेलनास महाराष्ट्र, गुजरात मधील ग्रामीण क्षेत्रातील १०८५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यातील उद्या दि.८ जून ला तिसऱ्या टप्प्याचा समारोप होईल. यामध्ये ३१ बिझनेस व इन्होव्हेशन विद्यार्थी सादर करणार आहेत.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.