एरंडोलच्या महिलेची साडेआठ लाखांमध्ये ऑनलाईन फसवणूक ; गुन्हा दाखल
जळगाव ;-बँक ऑफ महाराष्ट्र च्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून महिलेला व्हाट्सअप वरील एप्लीकेशन लिंक पाठवून ती डाऊनलोड करण्याचे सांगून चार जणांनी आठ लाख 55 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला महिलेच्या फिर्यादीवरून चार अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की शर्मिला अनिल चिकाटे वय 50 या नोकरी करीत असून त्या रामदास कॉलनी म्हसावद रोड एरंडोल तालुका जिल्हा जळगाव येथे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. चार ऑगस्ट 2023 रोजी शर्मिला चिकाटे यांच्या मोबाईल क्रमांकावर बँक ऑफ महाराष्ट्र च्या कस्टमर केअर मधून बोलत असून तुमची बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये गेलेली रक्कम मिळवून देण्याच्या आमिषाने तीन मोबाईल क्रमांकावरून संपर्क करून शर्मिला चिकाटे यांना व्हाट्सअप क्रमांकावर एप्लीकेशन ची लिंक पाठवून एप्लीकेशन डाउनलोड करण्यास सांगितले त्यानंतर शर्मिला यांच्या मोबाईल वरूनच त्यांनी त्यांच्या कॅनरा बँक खात्याची माहिती चोरून त्या खात्यामधून आठ लाख 55 हजार रुपयांची रक्कम ऑनलाईन काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. शर्मिला चिकाटे यांच्या फिर्यादीवरून सायबर पोलीस स्टेशनला तीन मोबाईल धारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक बी डी जगताप करीत आहे.