DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

कुलगुरु लेफ्ट माधुरी कानिटकर यांच्या जन्मदिनानिमित्‍त रक्‍तदान शिबिर

जळगाव – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांच्या वाढदिवसानिमित्‍त गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), युथ रेडक्रॉस विंग्स (वायआरसी), रोटरॅक्ट क्‍लब गोदावरी आणि स्टुडंट वेल्फेअर विभाग यांच्यावतीने रविवार दि.१५ रोजी रक्‍तदान शिबिर घेण्यात आले असून यात ३० विद्यार्थ्यांनी रक्‍तदान केले.

रक्‍तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून या दानामुळे अनेकांचे जीव वाचविले जातात, त्यामुळे रक्‍तदानाला विशेष महत्व असल्यामुळे गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.विशाखा वाघ, प्रा.शिवानंद बिरादर, प्रशासकीय अधिकारी प्रविण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्‍तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरास डॉ.उल्हास पाटील रक्‍तपेढीचे सहाय्य लाभले.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.