DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये विविध उपक्रमांनी बालदिन उत्साहात साजरा

स्पर्धांमध्ये रमले चिमुकले, विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद

जळगाव | प्रतिनिधी
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गणपती नगर येथील जी. एच. रायसोनी वंडर किड्समधील प्लेग्रुप व नर्सरीचे विद्यार्थीही जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये साजरा होत असलेल्या बालदिनाच्या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, बालगीत, वेशभूषा या स्पर्धा घेण्यात आल्या. सर्वप्रथम शिक्षकांद्वारे सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच, कार्यक्रमाची सुरुवात पंडित नेहरू व सरस्वती मातेच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल व जी. एच. रायसोनी वंडर किड्सच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी यांनी विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा देत चाचा नेहरू यांच्या जीवनातील काही प्रसंग गोष्टी रूपाने सांगितल्या. याप्रसंगी विद्यार्थ्यांना आपल्या रोजच्या अभ्यासातून थोडी उसंत मिळावी म्हणून शिक्षकांनी विविध सामूहिक खेळांचे आयोजन केले होते. या दरम्यान, इयत्ता पाचवीसाठी बॉल थ्रो, सहावीसाठी दोरी उडी, इयत्ता सातवी व आठवीसाठी क्रिकेट आणि प्रश्नमंजुषा इत्यादी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना यावेळी भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच या बालदिनाच्या कार्यक्रमात शिक्षकांनी नृत्य सादरीकरणाने उपस्थित विध्यार्थ्यांचे मनोरंजन करत त्यांचा उत्साह द्विगुणीत केला. सदर कार्यक्रमाची रूपरेषा शिक्षिका अल्फिया लेहरी यांनी मांडले. सूत्रसंचालन शिक्षिका लीना त्रीपाटी व अश्विनी घोगले यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, आरती पाटील, संजय चव्हाण, नलिनी शर्मा, अमन पांडे, तस्लिम रंगरेज, सविता तायडे, तुषार कुमावत, विजया लोंढे, शुभांगी बडगुजर व आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी व मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी अभिनंदन केले.

बातमी शेअर करा !

 

Leave A Reply

Your email address will not be published.