जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यानी एकसोबत पाहिला “३५० व्या शिवराज्याभिषेक”चा लाईव्ह सोहळा
विध्यार्थी झाले नेत्रदीपक राज्याभिषेक सोहळ्याचे साक्षीदार ; महाविध्यालयाच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
जळगाव : स्वराज्याची स्थापना करण्याचं ध्येय घेऊन वयाच्या १६ व्या वर्षी शपथ घेणाऱ्या शिवरायांचे बरोबर ३५० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी ‘छत्रपती’ शिवाजी महाराज झाले! रायगडावर मोठ्या दिमाखात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. त्या घटनेला आज ३५० वर्षं पूर्ण झाली. यानिमित्ताने रायगडावर मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला गेला मात्र त्याचवेळी हा सोहळा फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूबसह विविध वृत्त वाहिन्यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रसारित करण्यात आले. त्याचा जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील विध्यार्थ्यानी हा सोहळा संपूर्ण लाइव्ह पाहत या राज्याभिषेक सोहळ्याचा लाभ घेतला. यावेळी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अॅडमिनिस्ट्रेशन डीन प्रा. डॉ. संजय शेखावत हे उपस्थित होते. रायसोनी महाविद्यालयाच्या प्रशस्त सभागृहात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘शिवराज्याभिषेक’ दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाची नेहमीच चर्चा होत असते. या कार्यक्रमाना दिग्गज वक्त्यांची प्रभावळ लाभलेली असते. यंदा ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळ्याची पर्वणी साधण्यासाठी विविध शहरातील नागरिकांनी रायगड येथील कार्यक्रमस्थळी तुडुंब गर्दी केली. हाच कार्यक्रम घरबसल्या शिवप्रेमींना पाहता यावा यासाठी प्रसार माध्यमांनी विशेष व्यवस्था केली होती. त्याचा लाभ रायसोनी महाविद्यालयातील विध्यार्थ्यानी घेतला. कार्यक्रम सुरू होताच अनेकांनी एकमेकांना या ‘शिवराज्याभिषेक सोहळ्याची’ लिंक शेअर केल्या. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे १३ वे वंशज श्री. संभाजी राजे छत्रपती यांनी व्याख्याना दरम्यान मांडलेले विचार विद्यार्थ्यांनी ऐकले. जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटमधील सर्व विध्यार्थ्यानी एकत्र येत ‘शिवराज्याभिषेक सोहळ्याची’ शिदोरी जमा केली. या उपक्रमासाठी प्रथम वर्ष विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वडद्कर व जनसंपर्क अधिकारी बापूसाहेब पाटील यांचे सहकार्य लाभले. तसेच सदर उपक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.