DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धमाका! गिरीश महाजन उपमुख्यमंत्री होणार?

जळगाव : राज्यात ‘मिशन 45’ फेल झाल्यानंतर उद्विग्न झालेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. या निर्णयावर ते ठाम असल्याचे दोन दिवसांपासून समोर येत आहे. आता आपल्या निर्णयाबाबत फडणवीस केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करणार आहेत. यात मागणी मान्य झाल्यास फडणवीसांचे निकटवर्तीय असलेले गिरीश महाजन यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड होण्याची चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचीही या निवडणुकीत पुरती वाताहात झाली आहे. त्याची संपूर्ण जाबाबदारी स्वीकारत फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदातून मुक्त होण्यीची इच्छा व्यक्त केली. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पूर्ण वेळ पक्ष संघटनेचे काम करण्याचा त्यांचा निर्धार आहे. फडणवीसांच्या या निर्णयास भाजपच्या नेत्यांचा विरोध आहे. तसेच महायुतीतील नेत्यांनी हा पराभव सामूहिक असल्याचे सांगितले.
भाजपसह महायुतीतील नेत्यांनी फडणवीसांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते त्यांच्या निर्णयावर ठाम आहे. याबाबत त्यांनी नागपुरात जाऊन राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर ते दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्री शाह यांच्याशी चर्चा करणार आहेत. या चर्चेत त्यांची मागणी मान्य झाल्यास फडणवीसांच्या जागी उपमुख्यमंत्री म्हणून गिरीश महाजान यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीतील भाजपने 28 पैकी 9, शिंदे गटाने 15 पैकी 7 तर अजित पवार गटाने 5 पैकी 1 असे यश मिळवले. मात्र महाविकास आघाडीने 31 जागा पटकवल्या आहेत. या अपयशाची सर्व जबाबदारी स्वीकारत फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी केली होती. आता त्यांच्या या निर्णयावर काय भाजपश्रेष्ठी निर्णय घेणार, याकडे राज्याचे लक्ष आहे.

बातमी शेअर करा !

 

Leave A Reply

Your email address will not be published.