DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

हतनुर धरणाचे ४१ दरवाजे उघडले ; जिल्हाधिकाऱ्यांची निंबोल गावात भेट

प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

जळगाव:-  जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्यामुळे हातनुर धरण भरल्यामुळे हातनूर धरणाचे ४१ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहे. हतनूर धरणातून 10580.00 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग प्रशासनाकडून करण्यात आला असून धरणाच्या काठावर असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीत किंवा घाटाजवळ न जाण्याचाही आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी हतनूर धरण क्षेत्रातील निंबोल या गावी भेट देऊन पूरस्थितीची पाहणी करून अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या.

 

दरम्यान हतनूर धरणाच्या (पूर्णा व तापी नदीच्या) पाणलोट क्षेत्रातील पाऊस व येव्याचा अभ्यास करता तसेच धरण पातळीत होणारी वाढ विचारात घेवून १६ रोजी 04.00 वा. हतनूर धरणातून 10580.00 क्युमेक्स ( 374214.6 क्युसेक्स ) प्रवाह नदीपात्रात सोडणेत आलेला आहे. त्यासाठी धरणाचे 41 गेट पूर्ण उघडून प्रवाह सोडणेत आलेला आहे.अशी माहिती जालगाव पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.