DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत आयएमआरच्या महिला संघाला विजेतेपद

जळगाव ;– के सी ई चे शारीरिक शिक्षण महाविद्यालयातर्फे एकलव्य क्रीडा संकुल, जळगाव. येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत आय एम आर च्या महिला संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकाविला. अंतिम सामना हा मु जे . महाविद्यालयासोबत झाला

. या संघात कु. मृणाल राजेश कुलकर्णी, कु. मेघना जयेश जीवराजानी, कु. नेहा विजय चौधरी, कु. प्रज्ञा रवींद्र सौंदाणे या खेळाडूंचा सहभाग होता. यात मृणाल कुलकर्णी व नेहा चौधरी यांनी उत्कृष्ट खेळ करत विजय संपादन केला. तसेच दिनांक 21 – 22 ऑक्टोबर 2023 रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव येथे होणाऱ्या आंतर विभागीय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेसाठी मृणाल कुलकर्णी व नेहा चौधरी यांची निवड करण्यात आली. खेळाडूंच्या या यशाबद्दल आय एम आर च्या संचालिका डॉ. शिल्पा किरण बेंडाळे यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. शारीरिक संचालिका डॉ. नीलिमा पाटील यांनी संघाला मार्गदर्शन केले.

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.