DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

रेडक्रॉसच्या अद्ययावत ब्लड डोनर कोचचे उद्घाटन

जिल्हाधिकारी महोदयांनी स्वतः रक्तदान करून दिली युवकांना प्रेरणा

जळगाव :  रेडक्रॉस राष्ट्रीय शाखा, नवी दिल्ली आणि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेडक्रीसेंट यांच्या योगदानाने जळगाव रेडक्रॉस रक्तकेंद्राला देणगी स्वरुपात प्राप्त झालेल्या अद्ययावत सहा ब्लड डोनर कोच युनिटचा उद्घाटन सोहळा आज जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस पद्सिध्द अध्यक्ष मा.श्री.अमन मित्तल आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्या  उत्स्फूर्त रक्तदानाने संपन्न झाला. या प्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ.योगिता बाविस्कर, रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, चेअरमन विनोद बियाणी, रक्तकेंद्र चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, कार्यकारिणी सदस्य श्री.सुभाष सांखला, श्री. विजय पाटील, सौ. पुष्पाताई भंडारी, डॉ. अपर्णा मकासरे, सौ.शांताताई वाणी हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रक्तकेंद्र चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी रेडक्रॉस रक्तकेंद्राच्या आता पर्यंतच्या सेवेबाबत आणि अद्ययावत तंत्रज्ञानाबद्दल सविस्तर माहिती देत जिल्हाधिकारी महोदयांच्या रक्तदानामुळे रक्तसंकलनाचा आलेख उंचावेल अशी अपेक्षा व्यक्त केली.  रेडक्रॉसचे उपाध्यक्ष श्री. गनी मेमन यांनी रेडक्रॉस जिल्हा शाखेचे कार्य सविस्तर सांगत सर्व सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमातून हि सेवा देणे शक्य होत आहे. यासाठी वेळोवेळी अनेक सेवाभावी व्यक्तींचे, संस्थाचे योगदान लाभत आहे, भविष्यातही विविध उपक्रमांच्या माध्यमातून कार्य असेच सुरु राहील अशा भावना व्यक्त केल्या.

 

 

जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस पद्सिध्द अध्यक्ष मा.श्री. अमन मित्तल यांनी शुभेच्छा देताना सांगितले कि,जळगाव रेडक्रॉसचे कार्य अतिशय कौतुकास्पद असून अतिशय उत्कृष्ठ सेवाकार्य सुरु आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या  अनेक शासकीय योजनांमध्ये रेडक्रॉसचा सहभाग झाल्यास रेडक्रॉस अजून जोमाने कार्य करेल अशी अपेक्षा व्यक्त करीत सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

 

उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते ब्लड डोनर कोच युनिटचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस पद्सिध्द अध्यक्ष मा.श्री.अमन मित्तल आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी रक्तदान केले. सोबत रेडक्रॉसचे चेयरमन श्री. विनोद बियाणी, अड. सागर चित्रे, प्रा. सौ. शमा सराफ, श्री. श्यामकांत जगताप, श्री. राहुल पाटील यांनी हि रक्तदान केले.  जिल्हाधिकारी मा.श्री.अमन मित्तल यांचा स्मृतिचिन्ह देऊन आणि सर्व रक्तदात्यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.        या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी सौ. उज्वला वर्मा यांनी केले आणि आभार चेअरमन श्री. विनोद बियाणी यांनी व्यक्त केले.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.