DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! दहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेसाठी अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने २०२३ ची परीक्षा २०२० मध्ये झाली त्याप्रमाणे घेण्यासाठी मंडळाने तयारी केली आहे.

कधी होणार परीक्षा?
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा मंगळवार २१ फेब्रुवारी २०२३ ते मंगळवार २१ मार्च २०२३ या काळात होईल, तर दहावीची परीक्षा गुरुवार २ मार्च २०२३ ते शनिवार २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडतील. यंदा परीक्षा १०० टक्के अभ्यासक्रमांवर होणार आहेत. ज्यादाचा वेळ मिळणार नाही.

 

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावी परीक्षेच्या अनुषंगाने आधीच तयारी सुरू केली होती. करोनानंतर नियमित परीक्षा होत असल्याने, परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्थेची मंडळाकडून चाचपणी करण्यात आली. आठ डिसेंबरपासून पुन्हा जिल्हानिहाय बैठकांचे नियोजन करण्यात आले होते. विभागात दहावी, बारावी परीक्षेसाठी नोंदणी संख्या वाढली आहे.

करोना प्रादुर्भावामुळे २०२१ ची दहावी, बारावी परीक्षा झाली नव्हती. त्यासाठी अंतर्गत मूल्यमापन गुणदान करण्यात आले होते. २०२२ मध्ये करोनाचा प्रादुर्भाव कायम होता. परीक्षा घेण्यात आली, परंतु शाळा तेथे केंद्र, २५ टक्के अभ्यासक्रम कमी, अधिकचा वेळ असे बदल मंडळाने केले होते.

शाळा तेथे परीक्षा केंद्र नसणार. त्यामुळे परीक्षेची व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी मंडळाची धांदल वाढली. शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, परीक्षार्थींची संख्या, विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था, सोयीसुविधांबाबतचा आढावा विभागीय पातळीवर निश्चित करण्यात आला.

यंदा दहावी, बारावीचे सुमारे वीस नवीन परीक्षा केंद्र वाढू शकतात, असे सांगण्यात येत आहे. दहावीसाठी विभागात पाच जिल्ह्यांत साडेसहाशेपेक्षा अधिक, तर बारावीचे पावणेचारशेपर्यंत परीक्षा केंद्र संख्या असतील असे सांगण्यात येते. जिल्हानिहाय बैठकांमधून परीक्षा केंद्रांचा पुन्हा आढावा घेतला जाणार आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.