DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगाव मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

जळगाव :- महनगरपलिकेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे मनपा शाळेतील पहिली ते पाचवीच्या २७०० विद्यार्थ्यांना दप्तर, कंपास पेटी, डब्बा, वॉटरबॅग वाटप व बालवाडीच्या विद्यार्थ्यांसह नववी ते दहावीच्या २१३ विद्यार्थिनींना गणवेश वाटपाचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला.

मनपा प्रशासकीय इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात ‘मेरी मिट्टी मेरा देश’ सप्ताहाचे औचित्य साधून प्रातिनिधिक स्वरूपात प्रत्येकी २० विद्यार्थ्यांना गणेश, दप्तर, शैक्षणिक साहित्य वाटप महापौर जय श्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त विद्या गायकवाड, नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील, विशाल त्रिपाठी, उपायुक्त अविनाश गांगोडे, सहाय्यक आयुक्त अश्विनी गायकवाड, अभिजित बाविस्कर, गणेश चाटे, उदय पाटील, सुनील गोराणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी मनपाचे सर्व अधिकारी, विभागप्रमुख उपस्थित होते. मनपाच्या इतिहासात प्रथमच महानगरपालिका मार्फत विद्यार्थ्यांना अशा प्रकारे साहित्य वाटप करण्यात आले.

 

याप्रसंगी महापौर जयश्री महाजन यांनी मनोगत व्यक्त करतांना मनपा शाळेतील विद्यार्थी संख्या वाढविणे व गुणवत्ता वाढविणे आवश्यक असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. आयुक्त विद्या गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करतांना मनपा शाळेतील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन, गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटपासह विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना केल्या.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.