DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

आयशरची दुचाकीस्वाराला जोरदार धडक ; दोन जण गंभीर

जळगाव : राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असतांना भरधाव आयशरने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याची घटना महामार्गावरील साईराज रेस्टॉरंटसमोर काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये दोन जण जखमी झाले.

दीपक गोकुळ सोनवणे व त्यांचा मुलगा लोकेश दीपक सोनवणे (वय ५, रा. बीबा नगर) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

शहरातील बीबा नगरात दीपक सोनवणे हे वास्तव्यास असून ते (एमएच १९ डीयू १४४७) क्रमांकाच्या दुचाकीने मुलगा लोकशला घेवून द्वारका नगरात जाण्यासाठी निघाले. महामार्ग ओलांडत असतांना पाळधीकडून जळगावकडे जाणाऱ्या (एमएच ३१ एफसी ४७४५) क्रमांकाच्या आयशरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार दीपक सोनवणे त्यांच्या मुलगा लोकेश हे दोघ गंभीर जखमी झाले. दरम्यान, महामार्गावरुन जाणाऱ्या नागरिकांनी जखमी बापलेकाला तात्काळ वाहनातून खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.

अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अनिल फेगडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. धडक देणारा आयशर ट्रक त्यांनी ताब्यात घेतला असून तो पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.