डॉ. उल्हास पाटील कृषि महाविद्यालय येथे उत्साहात बैल पोळा साजरा
जळगाव;- येथील डॉ. उल्हास पाटील कृषि महाविद्यालयाच्या कृषि कन्यांनी बैल पोळा सण कृषी कन्यांकडून फैजपूर येथे उत्साहात साजरा केला. बैल पोळ्या निमित्त काही सधन शेतकऱ्यांनी बँड बाजासह वाजत गाजत आपल्या – पशुधनाच्या गावातून मिरवणुका काढल्या.
या मिरवणुकीमध्ये वृध्द शेतकऱ्यांसह तरुण शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वर्षभर शेतात शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी अपार कष्ट करण्याऱ्या शेतकऱ्यांचा सच्चा मित्र बैल यांना बैल पोळ्याच्या दिवशी गळ्यात घुंगराच्या माळा, शिंगाला रंग व अंगावर रंगाने विविध प्रकारची सजावट व अंगावर झुली या पध्दतीने पोळ्या निमित्त सजवले. बैलांची व इतर पशु धनाची गावातून शेतकऱ्यांकडून मिरवणुका काढण्यात आल्या.
घरात पुरण पोळीचा स्वयंपाक करून बैलाची पुजा करुन बैलांना पुरणपोळी खाऊ घालण्यात आली. वर्षभर शेतातील विविध कामात शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या बैलाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा बैलपोळ्याचा सण साजरा करण्यात येतो. बैलपोळ्या निमित्त या भागात शेतकरी दिवसभर उपाशी राहुन बैलाचा उपहास करतात बैलांना सायंकाळी पुरणपोळीचे जेवण दिल्या नंतरच शेतकरी जेवण करतात. बैल पोळ्या निमित्त शेतकऱ्यांनी बैलाची सजावट करुन घरी पूरण पोळीचा स्वयंपाक करुन सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बैलाची व इतर पशुधनाची विधीवत पुजा करुन बैलांना व इतर पशुधनाला पुरणपोळीचे जेवण दिल्या नतंर शेतकऱ्यांनी जेवण करुन उपवास सोडला.