DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

शास्त्राचं परिपूर्ण अध्ययन करूया चला भविष्यवेत्ता घडवूया !

जळगावात होणार तीन दिवसीय आगळं-वेगळं शिबीर

जळगाव : शहरातील आर्यन इको रिसॉर्ट येथे श्री ज्योतिष संशोधन केंद्रातर्फे ‘शास्त्राचं परिपूर्ण अध्ययन करूया चला भविष्यवेत्ता घडवूया’ या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर येत्या ३ फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारी असे तीन दिवस राहणार आहे.

२१ व्या शतकातील ज्योतिष शास्त्राचे महत्व काय आहे याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातील ज्योतिष शास्त्राचे दिग्गज यासाठी उपस्थित राहणार आहे. विशेष म्हणजे ज्योतिष शास्त्रातील विविध प्रकारच्या 8 शाखांमधील हे दिग्गज आहेत. तर महाराष्ट्रातील जवळपास 55 निवडक अभ्यासक देखील यात सहभागी होणार आहे. तर 5 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत 4 वर्षे अभ्यास करणाऱ्यांचा गौरव सोहळा होणार आहे. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री मा. गुलाबरावजी पाटील यांची उपस्थिती असेल. तसेच 5 रोजी दुपारी 4 ते 6 वेळेत शहरातील नागरिकांना देखील उपस्थितीसाठी आवाहन करण्यात येत आहे.

 

या कार्यशाळेचे शुभारंभ ३ फेब्रुवारी पहिले सत्रात सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान ज्योतिर्विद सौ. गौरी केंजळे यांचे अंकशास्त्र, न्युमरोलॉजी मोबाईल न्युमरोलॉजी, तर दुपारी 3 ते 5 ज्योतिर्विद श्री श्याम भोसले यांचे विशिष्ट वास्तुशास्त्र, संध्याकाळी ७ ते रात्री ९ श्री आनंद घुर्ये याचेबिझनेस अॅस्ट्रॉलॉजी, तर ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी १ अस्ट्रोगुरु डॉ. सौ ज्योती जोशी यांचे अष्टकवर्ग -अचूक फलादेशाचा उत्तम मार्ग, दुपारी ३ ते संध्याकाळी ५ श्रीमती नीलम पोतदार यांचे केपी प्रश्न कुंडली + जातक कुंडली, संध्याकाळी ७ ते रात्री ९ दरम्यान अॅड. सुनीता पागे यांचे टॅरोकाईस एक सोपे पण उपयुक्त शास्त्र, 5 रोजी सकाळी ११ ते दुपारी १ श्री संजय बुधवंत यांचे सामूहिक शास्त्र वास्तु शास्त्र, मेदिनीय, ज्योतिष ते शेअर मार्केट आणि दुपारी ३ ते संध्याकाळी ५ दरम्यान श्री. सुनील पुरोहित यांचे इज डेस्टिनी मॅनेजमेंट अ रिऍलिटी? (भाग्याचे व्यवस्थापन खरेच करता येते?) या विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.

प्रथमच या पद्धतीच्या कार्यशाळेचे आयोजन होत असून याठिकाणी अनेक शाखांचे अभ्यासक सहभागी होणार आहे. यासाठी अभिजित प्रतिष्ठान द इन्स्टिट्युट ऑफ डेस्टिनी मॅनेजमेंट मुंबई यांचे सहकार्य मिळाले आहे. तरी या कार्यक्रमात 5 रोजी संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत शहरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक ज्योती जोशी यांनी केले आहे.

डॉ. सौ. ज्योती जोशी, मो. 98500098688
अधिक माहितीसाठी :  www.drjyotijoshi.com

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.