DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

कृषिक्षेत्रासाठी अर्थसंकल्पाची सप्तर्षी

 

दिव्यसारथी ऑनलाईन डेस्क  : केंद्र सरकारने मांडलेलं बजेट शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी पायाभूत सोयी सुविधा पुर्ण करण्यासाठी चांगलं बजेट आहे. असं मी म्हणेन. शेतकऱ्यांसाठी सप्तर्षी च्या माध्यमातून जर शेतकऱ्यांनी सर्व योजनांचा विनीयोग करायचा ठरवले आणि फायदा घ्यायचा ठरवला तर शेतकऱ्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून शेतकऱ्यांनी याची माहिती घेऊन त्याचा उपयोग केला पाहिजे. आपण कुठे काय करू शकतो याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. यासोबतच पायाभुत सुविधांसाठी खूप मोठा पैसा सरकारने दिला आहे. पायाभूत सुविधा म्हटल्या म्हणजे त्यात रेल्वेचे जाळं, महामार्ग, पोर्ट, विमानतळे आले, त्यानंतर भुयारी बोगदे आले, ब्रिजेज आले. यामुळे दळणवळण चांगले होणार आहे. परंतू यातून रोजगार निर्मिती मोठ्याप्रमाणात आताही झालेली आहे आणि पुढेही जास्त प्रमाणात होणार आहे. पंतप्रधान आवास योजनेचा समावेश यामध्ये केला आहे. संपूर्ण भारतात पायाभूत सुविधांचे जाळे विणले जात आहे.  

 

जलजीवन हर घर पेयजल देण्याचं जे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  2014 पासून पाहिले आणि त्यावर त्यांनी सातत्याने काम करणे सुरू केले आहे.  याविषयाचा सर्व नागरिकांना फायदा होतो आहे. हे आम्ही या क्षेत्रात असल्याने दिसून येतो आहे. आणि याच भावनेतून  त्यांनी या योजनेचे बजेट 60 हजार कोटींवरून 70 हजार कोटींवर नेले ही मोठी बाब आहे. यामुळे प्लास्टिक उद्योगालाही  चांगले दिवस येणार आणि त्यासह शेतकऱ्यांना, नागरिकांना पेयजल मिळेल हे अधिक महत्त्वाचे  वाटते. त्यासोबत शेतकऱ्यांसाठी  ठिबक सिंचन सारख्या विविध योजनांना गतिमान करण्यासाठी जास्त तरतूद केली आहे.

डिजीटल अॅग्रिकल्चर ही कन्सेप्ट सरकारने आणण्यासाठी निधीची तरतूद केलेली आहे ही चांगली बाब आहे. यात आमच्या कंपनीनेसुद्धा सुरुवात केलेली आहे. अॅग्रीटेक किंवा डिजिटल इन अॅग्रिकल्चर हे शेतकरी आत्मसात करायला लागले आहेत. सध्या निवडक शेतकरी याचा उपयोग करत असून पुढील काळात ही संख्या वाढेल. यामुळे उत्पादन क्षमता वाढून भारताचे नाव या क्षेत्रात अधिक उंचीवर जाईल.

सोबतच हरित क्रांती ही फक्त शेतीमध्येच आतापर्यंत बोलली जात होती परंतु यापुढे ती वाहनांमध्ये येणार आहे. इंधन आतापर्यंत कोळशापासून वेगवेगळ्या माध्यमांपासून बनत होते परंतु सोलरला त्यांनी हरित ऊर्जेत घेतलेले आहे. त्या सोबतच हायड्रोजनचे फ्युएलवर बसेस, ट्रक्स धावणार आहेत. बॅटरी ऑपरेटेड कार्स येत आहेत. इंधनाबाबत एक मोठेपाऊल भारताने उचलले आहे. जगाच्या पाठीवर भारत जगाच्या बरोबर सर्व क्षेत्रात येत आहे. त्यासाठी भारताचे शास्त्रज्ञ, इंजिनियर्स, उद्योजक जोमाने कामाला लागलेले आहेत. ह्या वर्षाचे बजेट खूप चांगल्या पद्धतीने सरकारने सादर केलेले आहे. सगळ्यांच्या जीवनात फायदा होणार आहे. सर्व सामान्यांसाठी जे काही टॅक्स बेनिफीट दिलेले आहेत अपेक्षेपेक्षा कमी आहेत परंतु त्यांनी काही तरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून जास्त देण्याचा प्रयत्न केला असता तर मध्यमवर्गीय , नोकरदार, सर्वसामान्य वर्ग अजून आनंदी झाला असता.

– अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि., जळगाव

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.