DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

मारहाण करत धमकी दिल्याने युवकाची आत्महत्या दोन महिलांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

यावल : तालुक्यातील चितोडा येथील २३ वर्षीय तरुणास दोन महिलांसह ५ जणांनी अज्ञात कारणावरून मारहाण व धमकी दिल्याने युवकाने यावल शिवारातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची फिर्याद मृत युवकाच्या वडिलांनी | दिल्यावरुन दोन महिलांसह ५ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील चितोडा येथील दुर्गेश संतोष किनगे (वय २३)

 

या तरूणास अज्ञात कारणावरून गावातील दोन महिलांसह भास्कर आनंदा जंगले, भूषण भास्कर जंगले, ज्ञानेश्वर भास्कर जंगले यांनी गुरुवारी सकाळी ९ वाजेपूर्वी गावात संतोष किनगे यास त्याच्या घरासमोर चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत तू गावातून निघून जा, अशी धमकी दिली. यामुळे या युवकाने भीतीपोटी यावल शिवारातील देविदास तुकाराम पाटील यांच्या शेता (गट नंबर ५५७ ) मधील विहिरीत उडी

मारून आत्महत्या केली. याप्रकरणी प्रारंभी गुरुवारी दुपारी चितोडा गावाचे पोलीस पाटील पंकज वारके यांच्या माहितीवरुन यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तर सायंकाळी उशिरा मृत तरुणाचे वडील संतोष किन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन महिलासह पाच संशयितांविरुद्ध तरुणाला आत्महत्येस करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोनि. राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनात उपनिरिक्षक अविनाश दहिफळे करत आहेत.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.