DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगावातून रिक्षाचालकाचा मोबाईल लांबविला

जळगाव;- : शहरातील खैरनार ऑप्टीकल ते चित्रा चौक दरम्यान रिक्षा चालकाचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवारी २७ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर सुरेश सोनवणे (वय २२) रा. सुरेशदादा जैन नगर, कानळदा रोड हा रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह चालवतो. बुधवारी २७ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास खैरनार आप्टीकल ते चित्रा चौक दरम्यानच्या रस्त्यावरून जात असतांना त्यांच्या रिक्षात ठेवलेला १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला, शहर पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार बशीर तडवी करीत आहे.

बातमी शेअर करा !

 

Leave A Reply

Your email address will not be published.