DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

सराईत गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई

जळगाव ;– शहरातील पिंप्राळा परिसरातील संशियत गुन्हेगार गणेश उर्फ नाना शांताराम कोळी (वय ३७) याच्यावर रामानंदनगर पोलिसांनी एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करत अटक केली आहे. ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे.
शहरातील पिंप्राळा परिसरात गुन्हेगार गणेश कोळी हा रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीरीत्या हातभट्टीची दारू विक्री करत होता. त्याच्यावर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे वेगवेगळे सात गुन्हेदाखल आहेत. रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी गणेश कोळी याच्यावर एमपीडीएची कारवाई करण्यात यावी, असा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षकएम. राजकुमार यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार अहवालाचे अवलोकन करून पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्याचे आदेश काढले. त्यानुसार रामानंदनगर पोलिसांना त्याला अटक करून ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गावळी, सहायक पोलीस अधीक्षक संदीप गावितस्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या सूचनेनुसार रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरूडे, पोलीस कॉन्स्टेबल संजय सपकाळे, सुशील चौधरी, सुनील दामोदरे, राजेश चव्हाण, विजय खैरे, पोलीस नाईक रेवानंद साळुंखे, विनोद सूर्यवंशी, रवींद्र चौधरी, उमेश पवार, जुलालसिंग परदेशी, इरफान मलिक, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर पाटील यांनी केली आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.