DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगावतील दोन गुन्हेगारांवर एमपीडीए

जळगाव : प्रतिनिधी 

जळगाव शहरातील  दोन कुविख्यात गुन्हेगारांवर जिल्हाधिकारी अमन मित्तल (Collector Aman Mittal)  यांनी स्थानबद्धतेची कारवाई केल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. रीजवान (Rizwan) उर्फ काल्या गयासोद्दीन शेख (22, अजमेरी गल्ली, तांबापुरा, जळगाव) व रीतेश (Ritesh)  उर्फ चिच्या कृष्णा शिंदे (21, एमडीएस कॉलनी, रामेश्वर कॉलनी, जळगाव) अशी स्थानबद्ध करण्यात आलेल्या संशयीताची नाव आहे. संशयीतांची नागपूर व अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील, एमआयडीसी निरीक्षक जयपाल हिरे, सहा.निरीक्षक मोरे, गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहिम, सुनील दामोदरे, हवालदार जयंत चौधरी, ईश्वर पाटील, एमआयडीसीचे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, नाईक सचिन पाटील, योगेश बारी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.