DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नितीन गडकरी उद्या जळगावात

जळगाव : जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची शिवतीर्थ मैदान (जी.एस.ग्राउंड) येथे उद्या शुक्रवार दिनांक १० मे २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता सभा होणार आहे. जळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ व रावेर लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारासाठी महायुतीची जिल्ह्यात पहिलीच सभा होत असल्याने नितीन गडकरी यांच्या सभेची उत्सुकता महायुतीच्या पदाधिकाऱ्यासह मतदारांमध्ये दिसून येत आहे. या सभेला स्मिताताई वाघ व रक्षाताई खडसे हे जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे दोन्ही उमेदवार उपस्थित राहणार.
असून राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.गिरीश भाऊ महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल दादा पाटील,जिल्ह्यातील महायुतीचे समनव्यक आ. मंगेश दादा चव्हाण, जळगाव शहराचेआ. सुरेश भोळे (राजूमामा), पाचोरा – भडगाव चे आ. किशोर आप्पा पाटील, पारोळा – एरंडोल आ.चिमणराव आबा पाटील, (एरंडोल पारोळा. आमदार), माजी खासदार श्री. ए. टी नाना पाटील, माजी आमदार शिरीषदादा चौधरी, माजी आमदार साहेबरावदादा पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार साहेबराव घोडे, माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, माजी आमदार रणधीर सावरकर,भाजपाचे प्रदेश चिटणीस अजय भोळे जळगाव लोकसभा प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी,राष्ट्रवादीचे (अजित पवार) जिल्हाध्यक्ष संजयजी पवार,भाजपा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष सौ. उज्वलाताई बेंडाळे, जळगाव पश्चिमचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, नंदू महाजन , शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष निलेशभाऊ पाटील,रावसाहेब पाटील,वासुदेव पाटील, मनसे चे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महानगराध्यक्ष अभिषेकभाऊ पाटील, मा.सौ. मीनलताई पाटील, सोनालीताई नारायण पाटील,शिवसेनेच्या सरिताताई कोल्हे, गणेशभाऊ सोनवणे,आर पी आय (आठवले) चे आनंदभाऊ खरात,अनिल अडकमोल,RPI (कवाडे गट) चे राजूभाऊ मोरे, कुंदन काळे, विनोद देशमुख मिलिंद सोनवणे, श्याम कोगटा, माजी महापौर भारतीताई सोनवणे,महेश पाटील, आशिष सपकाळे,भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख विशाल त्रिपाठी ,महानगर सरचिटणीस अमित भाटीया, महेश जोशी,अरविंद देशमुख, ज्योतीताई निंभोरे,जितेंद्र मराठे हे सभेला उपस्थित राहणार आहेत.

बातमी शेअर करा !

 

Leave A Reply

Your email address will not be published.