DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

नरेंद्र मोदींच्या विरोधात नेता नाही, निष्ठा नाही अन्‌ नीतीमत्ताही नाही

पाचोऱ्यातील प्रचार सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

पाचोरा : प्रतिनिधी

जळगावला कालच्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणात विकासाचा मुद्दा नाही. समाजाचा व दलिताचा विकास नाही. बेरोजगार व महागाईचा मुद्दा नाही. समाजाची गरिबांची गरिबी कशी दूर होईल, त्याचा मुद्दा नाही. त्यांनी अर्ध भाषण मोदीजींना आणि महायुतीला शिव्या देण्यातच केले. अरे या नरेंद्र मोदीजींच्या समोर नेता नाही, निती नाही, नियत नाही अशा लोकांना काय निवडून देणार भाजपाला. ४ जूननंतर बिळातून काढून मारू. अरे, अडीच वर्षे मुख्यमंत्री होते. तेव्हा उद्धव ठाकरे बिळ्यात लपले होते आणि आज बाहेर काढू म्हणता, वाघांना हात लावण्याची हिंमत आहे का? असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. कधी कधी बोलताना सत्य तोंडात येते आणि ते शरद पवार यांनी बोलताना बोलून दाखवलं की या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार आहे. कारण त्यांना पराभव लक्षात येत आहे. पवार साहेबांच्या नंतर उबाठा काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे. राष्ट्रवादी आणि उबाठा राज्यातून संपुष्टात येणार असल्याचेही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. जळगाव लोकसभेच्या निवडणुकीनिमित्त उमेदवाराच्या प्रचारार्थ भडगाव रोड येथे प्रचार सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसचे राहुल गांधी, शरदचंद्र पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केल्या.

शिवसेनेचे हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की, ज्या दिवशी शिवसेना काँग्रेस सोबत जाईल त्या दिवशी शिवसेनेचे दुकान बंद करू आणि आता उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची युती तर केलीच पण या निवडणुकीनंतर त्यांची उबाठा सेना काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार आहे आणि त्यांचे शिलेदार शरदचंद्र पवार असणार आहेत. गेल्या दहा वर्षात जनतेने भारतीय जनता पार्टीला भक्कम पाठिंबा दिला आताही तसाच पाठिंबा द्या. कारण नरेंद्र मोदींना मोठ्या मताने निवडून आल्यानंतर भाजपा विकासाची रेल्वे चालवायची आहे. विकासाच्या रेल्वेला मोदीजींचा इंजन लागलेला आहे आणि या मोदींच्या इंजिनाला एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, राज ठाकरेंची मनसे, रिपाई असे अनेक डबे जोडले गेले आहेत. या डब्यांमध्ये अल्पसंख्यांक, ओबीसी, दलित, आदिवासी या सर्वांना विकासाकडे घेऊन जाण्यासाठी भाजपाची विकास ट्रेन सुरू राहणार आहे.

नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात ८० हजार कोटी लोकांना मोफत धान्य दिले. पन्नास हजार कोटी लोकांना मोफत विविध योजना दिल्या. पाच लाखापर्यंत मोफत उपचार मोफत औषधी ‘आयुष्यमान भारत’ ही योजना दिल्या. शेतकऱ्यांना योजना दिल्या. एवढेच नव्हे पन्नास हजार कोटी महिलांना बचत गटामार्फत कर्ज दिले. तरुणांना व्यवसायासाठी ‘मुद्रा लोन’ दिल्या, असा झपाट्याने विकास गेल्या दहा वर्षभरामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. म्हणून पाचोरा-भडगाव मतदार संघाच्या तमाम जनतेने भाजपाला मतदान करावे आणि भाजपाला विजयी करावे. कारण २०२६ नंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभेमध्ये महिलांना ३३ टक्के, विधानसभेमध्ये महिलांना ३३ टक्के आणि आज या व्यासपीठावर बसलेले आहेत. याच्यानंतर पन्नास टक्के महिला व्यासपीठावर असतील. अशा महिलांना न्याय देण्याचे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. अखंड भारत, अखंड गरीब जनता ही आजही मोदीजींच्या पाठीशी आहे. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला विकासासाठी जास्तीत जास्त मतांनी विजयी करा, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केले.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.