DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

खडसेंच्या पराभवानंतर विरोधकांचा जल्लोष

जळगाव :  अत्यंत चुरशीच्या झालेल्या जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचा गड असलेल्या या दूध संघाला सुरुंग लागला असून भाजप-शिंदे गटाने दूध संघावर विजय मिळवला आहे. या विजयानंतर कार्यकर्त्यांनी डीजेवर ‘आमचा नेता पावरफुल’ गाणे वाजवून जल्लोष केला. यावेळी मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही डीजेच्या तालावर ठेका धरला.

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वातील शेतकरी पॅनलने घवघवीत यश मिळवलं. दूध संघात मिळवलेल्या यशानंतर महाजन समर्थकांनी एकच जल्लोष केला. गिरीश महाजन यांना खांद्यावर घेऊन कार्यकर्ते नाचले.

 

गिरीश महाजन यांच्यासोबत भाजपा आमदार मंगेश चव्हाण व त्यांच्या वडिलांना देखील कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेत जल्लोष साजरा केला. शेतकरी विकास पॅनलच्या नेत्यांनी गाण्यावर ठेका धरून आपला आनंद साजरा केला. ना. गिरीश महाजन, ना. गुलाबराव पाटील, आ. मंगेश चव्हाण, आ. चिमणराव पाटील, संजय पवार आदींसह उपस्थितांनी नृत्य करून वातावरणात रंग भरला. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.