DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

पाल येथील कृषी विज्ञान केंद्र सर्वोत्कृष्ठ

रावेर ;- भारतीय कृषी अनुसंधान परिषद (आय सी एं आर,नवी दिल्ली) अंतर्गत पुणे येथील कृषी तंत्रज्ञान उपयोजन संशोधन संस्था (अटारी) व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणी यांच्यातर्फे छत्रपती संभाजी नगर येथे २८ ते ३० जुलै २०२३ या कालावधीत आयोजित महाराष्ट्र,गुजरात व गोवा राज्यातील कृषी विज्ञान केंद्राची ६ व्या कार्यशाळेत सातपुडा विकास मंडळ संचालित कृषी विज्ञान केंद्र,पाल ता.रावेर जि-जळगांव यास उत्कृष्ठ सादरीकरण पुरस्कार मिळाला.

कृषी विज्ञान केंद्राची ६ व्या कार्यशाळेत प्रा.महेश महाजन(प्र.वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख) यांनी केव्हीकेच्या माध्यमातून २०२२-२३ या वर्षातील विविध माध्यमांचा वापर करून नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार,पिक प्रात्यक्षिके,शेती चाचण्या,विस्तार उपक्रम इत्यादी विषयी सादरीकरण केले.या कार्यशाळेत महाराष्ट्र,गुजरात व गोवा राज्यातील ८२ वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुखांचा देशातील नामवंत कृषी विद्यापीठातील कुलगुरूंचा सहभाग होता.सदर कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांना विविध बाबीवर मार्गदर्शन साठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात.या सर्व बाबींचा विचार करून आणि केलेल्या प्रशंसनीय कार्याची दाखल घेवून डॉ.इंद्र मणी (कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणी) यांच्या हस्ते व डॉ.जगदीश राणे (सी आय ए एच,बिकानेर),डॉ.लाखन सिंग (माजी संचालक,अटारी पुणे),डॉ.डी बी देवसरकर (संचालक,विस्तार शिक्षण, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणी) यांच्या उपस्थितीत उत्कृष्ठ सादरीकरण पुरस्कार कृषी विज्ञान केंद्राचे प्र.वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख प्रा.महेश महाजन यांना प्रदान करण्यात आला.यावेळी डॉ.यु एस गौतम (माजी संचालक,अटारी,बंगलोर),डॉ.किरण कोकाटे (माजी उप महासंचालक,कृषी विस्तार),डॉ.शरद गडाख (कुलगुरू,पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला),डॉ.झेड पी पटेल (कुलगुरू,नवसारी कृषी विद्यापीठ,नवसारी),डॉ.अनुप मिश्रा (कुलगुरू,केंद्रीय कृषी विद्यापीठ,इम्फाळ),डॉ.एस के रॉय (संचालक,अटारी पुणे),डॉ.धनराज उंदिरवाडे (संचालक,विस्तार शिक्षण, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला),डॉ.उमेश चीन्चमलातुरे व डॉ.किशोर झाडे आदी उपस्थित होते. या पुरस्कारा प्राप्त झाल्र्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.आ.श्री.शिरीष चौधरी,मा.श्री.अजित पाटील (सचिव,साविम) व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले.

 

कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून राबविले जाणारे उपक्रम शेतकऱ्यांच्या हिताचे असून केव्हीके ला मिळालेला पुरस्कार कृषी सेवेशी असलेली बांधीलकी आणि शेतकरी समाजाला सक्षम बनविण्याचे प्रतिक आहे यातून कार्याचा दर्जा सुधारल्याचे दिसून येते.उल्लेखनीय कामगीरी बद्दल केंद्रातील शास्त्रज्ञ व कर्मचारी यांचे अभिनंदन.कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी आणि समृद्धी साठी केव्हीके ने सतत प्रयत्नशील रहावे या शुभेच्छा. —— आ. शिरीष मधुकराव चौधरी (अध्यक्ष,सातपुडा विकास मंडळ,पाल)

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.