DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

राहुल गांधींना खासदारकी परत देण्याचा लोकसभाध्यक्षांचा निर्णय

नवी दिल्ली ;- काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर मोदी आडनावासंदर्भात चालू असणाऱ्या खटल्यात त्यांना दोषी ठरवण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राहुल गांधींना खासदारकी परत मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यानुसार आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना खासदारकी परत देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात लोकसभा सचिवालयाकडून अधिसूचना काढण्यात आली असून त्यानुसार राहुल गांधींना वायनाड मतदारसंघातली खासदारकी पुन्हा मिळाली आहे. त्यामुळे आजपासूनच राहुल गांधी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

२०१९ सालच्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान राहुल गांधींनी कर्नाटकच्या कोलारमध्ये मोदी आडनावाचा उल्लेख केला होता. सर्वच चोरांचं आडनाव मोदी कसं असतं? अशी खोचक टिप्पणी राहुल गांधी यांनी केली होती. त्यावर भाजपाचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली होती. त्यासंदर्भात आधी सत्र न्यायालय व नंतर गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवत त्यांना २ वर्षांची कमाल शिक्षा ठोठावली होती.

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.