DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

पारोळा स्मशानभूमीत आढळला मृतदेह

पारोळा : येथील धुळे रस्त्यावरील स्मशानभूमीत एका ४० वर्षीय वयाच्या इसमाचे शव स्मशानभूमीच्या मागील बाजूस वास येत असल्याने आढळून आले होते. त्या मृतदेहाचा दि. ८ रोजी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिस बंदोबस्त दफनविधी करण्यात आला. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या अज्ञात ४० वर्षीय शवची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांनी केले आहे. याबाबत प्रदिप गुलाबराव पाटील रा. पारोळा यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक फौजदार सुनील पवार हे करीत आहेत. दरम्यान दिनांक ८ रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास स्मशानभूमीत नगर पालिकेचे आरोग्य निरीक्षक टी.डी. नरनाळे, मुकारदम संदिप पाटील यांच्या सह नगरपालिका कर्मचाऱ्यानी अज्ञात ४० वर्षीय व्यक्तीच्या शवचे दफनविधी करण्यात आला.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.