DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

सुवर्णमहोत्सवानिमित्त रोझलॅण्ड इंग्लीश मिडीयम स्कुलच्या विविध उपक्रमांची आखणी

जाळगाव : येथील न्यू एरा एज्युकेशन सोसायटी संचालित रोझलॅण्ड इंग्लीश मिडीयम स्कुल (Roseland English Medium School)  पन्नासाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. शाळेच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने संस्थेने विविध उपक्रमांची आखणी केली आहे, असे संस्थेच्या अध्यक्षा रोझमीन खिमाणी प्रधान यांनी आज जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगीतले.

त्या पुढे म्हणाल्या की, मी स्वतः जरी अमेरिकेत वास्तव्यास असली तरी अध्यक्ष झाल्यापासून, संस्थेशी दररोज संपर्कात असते. तसेच दर सहा महिन्यांनी माझे जाणे-येणे सुरु असते. या सुवर्णमहोत्सवी वर्षात रोझलॅण्ड ग्रुप ऑफ इन्स्टीट्यूट व रोझलॅण्ड अॅकेडमीच्या माध्यमातून अनेक उपक्रम भारतातही सुरु करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत या अॅकेडमीच्या माध्यमातून अमेरीकेत काही उपक्रम राबविण्यात येतात. त्यातीलच एका व्हॉलेंटियर उपक्रमातंर्गत अमेरिकेतील विद्यार्थी हे दरवर्षी ३ महिन्यांसाठी भारतात येऊन, जळगावात मुक्कामी राहून येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन, त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष देतील. अमेरिकेत राबविण्यात येणारा आयबी प्रोग्रामसुद्धा जळगावातील रोझलॅण्ड शाळेतील स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमात अंशतः राबविण्यात येणार आहे.. जेणेकरुन प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणात ते उपकारक ठरेल. या उपक्रमात आयबी प्रणालीत पदवी संपादन केलेल्या सौ. खिमाणी यांची कन्या सानिया रोझ प्रधान यांनी पुढाकार घेतला आहे. सानिया प्रधान या योगा इन्स्ट्रक्टर व फ्रेंच भाषेतील पदवीधर आहेत. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, कौशल्य आणि त्यांच्यातील सुप्त कलागुणांचा विकास घडविण्याकडे प्रामुख्याने लक्ष दिले जाणार आहे. शालेय अभ्याक्रमासोबतच विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती हा प्रमुख हेतू या उपक्रमांमागे असल्याचे सौ. खिमाणी यांनी सांगीतले. संस्थेचे सल्लागार व हैदराबाद येथील EFL विद्यापीठाचे माजी कुलगुरु २००७ पासून अमेरिकेतील अॅटलांटा येथे स्थायिक असलेले डॉ. व्ही. गणेशन हे देखील शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत.

 

सन १९७४ मध्ये स्व. डी. एस. खिमाणी मॅडमने न्यू एरा एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्याकाळी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण सहज उपलब्ध व्हावे या हेतूने सुरु झालेल्या संस्थेच्या वाटचालीत आजवर अनेकांचे सहकार्य लाभले आहे. सुरुवातीला एका झाडाखाली अवघ्या १७ विद्यार्थ्यांना घेऊन सुरु झालेल्या या शाळेचा आज वटवृक्ष निर्माण झाला आहे. खिमाणी मॅडमच्या पश्चात त्यांचे पती स्व. एस. पी खिमाणी यांनी संस्थेचे कामकाज बघितले. आज इंग्रजी माध्यमासोबतच मराठी माध्यमातील रोझलॅण्ड प्राथमिक विद्यामंदीरही संस्थेतर्फे चालविण्यात येते.

 

शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या या शाळेतून शिकून अनेक विद्यार्थी संपूर्ण भारतात व विदेशात मोठमोठ्या पदांवर पोहचले आहेत. त्यांचे सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने २४ डिसेंबर २०२३ ला आयोजित करण्यात येणाऱ्या संमेलनासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही आम्ही या निमित्ताने करत आहोत.

यावेळी आय बी प्रोग्राम डीरेक्टर सानिया प्रधान यांनी आय बी प्रोग्राम बद्दल माहिती देत, आपल्या संपूर्ण टीम चा परिचय करून देत म्हणाल्या की, मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आम्ही सर्व मिळून कार्य करणार आहोत. त्यांच्या सोबत असलेल्या डेलीन यांनीही आपले मत व्यक्त करतांना सांगितले की, लहान मुलांसोबत त्यान्व्च्या भविष्याविषयी काम करतांना एक वेगळाच आनंद मिळतो. मुलांची उर्जा ही प्रेरणा देणारी आहे.

लौरा यांनी सांगितले की, मुलांच्या पुढील ध्येयाकडे प्रामुख्याने आम्ही लक्ष देणार आहोत. आणि हे आमचा कर्तव्य आहे. त्याचाबरोबर, डॉ. मोर्गन म्हणाल्या की, इंग्रजी आणि विज्ञानावर अधिक भर देऊन आम्ही कार्य करता आहोत.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.