DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

‘पठान’ चित्रपटातील तुफान बोल्ड गाणं रिलीज! दीपिकाचा जलवा पाहून चाहते प्रफुल्लित…

दिव्यासार्थी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटात शाहरुखशिवाय दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमसारखे स्टार्स दिसणार आहेत. या चित्रपटाचा टीझर काही काळापूर्वी प्रदर्शित झाला असून आता या चित्रपटाचे पहिले गाणे बेशरम रंग रिलीज करण्यात आले आहे. या गाण्यात शाहरुख आणि दीपिकाचा सिझलिंग अवतार पाहायला मिळत आहे.

यूट्यूबवर हे गाणे रिलीज झाल्यानंतर दोन तासांतच 1 मिलियनहून अधिक लोकांनी ते पाहिले आहे. हे गाणं पाहिल्यानंतर काही चाहत्यांनी अस म्हटलंय की, शाहरुख हा एकटाच बॉलिवूडला वाचवू शकतो. या गाण्यात दीपिका बर्‍याच हॉट ड्रेसमध्ये दिसली आहे. तिचा हॉट अवतार पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहेत. तर दुसरीकडे शाहरुखने त्याच्या एट पॅक अॅब्सने, तर कधी टोपी घालून चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे.

हे गाणे मॅलोर्का बेटावर चित्रित करण्यात आलं आहे. यापूर्वी सिद्धार्थ आनंदच्या वॉर या चित्रपटातही अशीच पार्श्वभूमी वाणी कपूर आणि हृतिक रोशनच्या ‘घुंगरू टूट गये’ या गाण्यात दिसली होती आणि हे गाणे चाहत्यांमध्ये सुपरहिट ठरले होते.

या चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी या गाण्याबद्दल सांगितले होतं की, 2023 मध्ये हे गाणे पार्टी अँथम म्हणून चाहत्यांनी अनुभवावे अशी आमची इच्छा आहे. आगामी काळातही हे गाणे चाहत्यांसाठी एक पार्टी साँग ठरेल, असं दिसून येतंय. दीपिका पदुकोणने 2007 मध्ये शाहरुख खानसोबत ‘ओम शांती ओम’ चित्रपटामधून पदार्पण केले होते. त्यानंतरही या दोन्ही स्टार्सनी रोहित शेट्टीसोबत चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटात काम केलं होतं.

शाहरुख आणि दीपिकाचे हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. पठाण चित्रपटात शाहरुख एका गुप्तहेराची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी 25 जानेवारीला रिलीज होणार आहे. या चित्रपटाद्वारे शाहरुख तब्बल 5 वर्षांनंतर सिनेसृष्टीत पुनरागमन करणार आहे. याशिवाय तो अॅटलीचा जवान आणि राजकुमार हिरानीच्या डंकी या चित्रपटातही दिसणार आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.