DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

अमळनेरात मंत्री अनिल पाटील यांच्या स्वागताची जय्यत तयारी

अमळनेर | प्रतिनिधी
नव्यानेच मंत्री पदाची शपथ घेणारे अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील (MLA Anil Bhaidas Patil) यांना धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री पद तसेच अन्न व नागरी पुरवठा हे महत्वाचे खाते दिले जाण्याची शक्यता मुंबई येथील सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत अधिकृत घोषणा झाल्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

नामदार अनिल पाटील पाटील यांचा दि 7 जुलै रोजी वाढदिवस असून त्याच दिवशी मंत्री महोदयांचे अमळनेर येथे आगमन होणार आहे. सकाळी 6 वाजता जळगाव येथे त्यांचे आगमन झाल्यानंतर वाहनाने ते अमळनेर येथे मंगळग्रह मंदिरात दाखल होणार आहेत. तेथून 9 वाजता बाईक रॅलीद्वारे त्यांची भव्य स्वागत रॅली काढण्यात येणार आहे. सदर रॅली पैलाड, तेथून दगडी दरवाजा, पाच कंदील चौक, सुभाष चौक, कुंटे रोड, बालेमिया, बस स्टॅन्ड येथून त्यांच्या निवासस्थानी दाखल होऊन दिवसभर शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते घरीच थांबणार आहेत.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.