DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जि. प. शाळा निंभोरा येथे विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण

निंभोरा बु: ता: रावेर;-  येथे स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सवानिमित्त “मेरी माटी मेरा देश” या उपक्रमा अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या विविध खेळात स्पर्धेत सहभागी होऊन प्राविण्य मिळविले व यश संपादन केले यासाठी निंभोरा ग्रामपंचायत ने ट्रॉफी, शालेय साहित्य व प्रमाणपत्र देत सन्मान, गुणगौरव करण्यात आला. पारितोषिक वितरण समारोह सरपंच सचिन महाले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला सर्वप्रथम सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी गावातील सर्व जि प शाळेतील स्पर्धांत यश मिळवणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व शालेय साहित्य देऊन गौरव करण्यात आला याप्रसंगी पत्रकार राजीव बोरसे ग्रामपंचायत सदस्य दिलशाद शेख सरपंच सचिन महाले व शालेय विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले
याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी गणेश पाटील व ग्रामपंचायत सदस्य सौ मंदाकिनी बराटे सौ. संगीता राणे ,अमोल खाचणे, सतीश पाटील, विकी खाचणे, अकील खाटीक ,धनराज राणे ,दस्तगीर खाटीक , शाळेचे केंद्रप्रमुख सौ. रागिनी लांडगे ,मुख्याध्यापक रूपाली नेहते, गोकुळ माळी सर उर्दू शाळेचे शेख वसीम , रईसा तडवी, हेमंत चौधरी, हेमलता पाटील व कन्या शाळेचे शिक्षिका पल्लवी राणे ,संजय सोनवणे तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य रवींद्र जोगी नरेंद्र गायकवाड हे होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी निलेश भंगाळे राहुल महाले ललित दोडके गौरव सोनवणे चंद्रकांत गवळी श्रीकांत पाटील यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.