DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

महागाईबाबत मोठे अपडेट ! आरबीआय गव्हर्नरने व्यक्त केली ‘ही’ अपेक्षा

दिव्यसार्थी ऑनलाईन डेक्स : 

दिवसेन वाढत जाणाऱ्या महागाईमुळे सामान्य जनता त्रस्त झाली. यातच आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास एक मोठी अशा व्यक्त केली आहे. किमतीतील वाढ हे एक मोठे आव्हान असल्याचे वर्णन करताना, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ऑक्टोबरमध्ये महागाईचा दर सात टक्क्यांपेक्षा कमी राहण्याची आशा व्यक्त केली आहे.

किरकोळ महागाई ऑगस्टमध्ये 7 टक्क्यांच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये 7.4 टक्क्यांवर पोहोचली. अन्न आणि ऊर्जा उत्पादनांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे ही वाढ झाली आहे. गेल्या सहा-सात महिन्यांत सरकार आणि आरबीआयने केलेल्या उपाययोजनांमुळे ऑक्टोबर महिन्यातील महागाई दरात घट होण्याची अपेक्षा दास यांनी व्यक्त केली.

महागाई दर

एका कार्यक्रमात ते म्हणाले की, महागाई दोन ते सहा टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्याचे उद्दिष्ट बदलण्याची गरज नाही कारण सहा टक्क्यांपेक्षा जास्त महागाईचा दर आर्थिक विकासावर परिणाम करेल. सरकारने चलनवाढीचा दर दोन ते सहा टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्याची जबाबदारी आरबीआय गव्हर्नरच्या अध्यक्षतेखालील चलनविषयक धोरण समितीवर (mpc) सोपवली आहे.

मजबूत मूलभूत तत्त्वे

भारतीय अर्थव्यवस्थेबाबत, आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, जागतिक अशांततेच्या काळात, भारताचे एकूणच स्थूल-आर्थिक मूलभूत तत्त्वे मजबूत आहेत आणि आर्थिक वाढीची शक्यता चांगली दिसत आहे. ते म्हणाले, “ऑक्टोबरसाठी महागाईचा आकडा 7 टक्क्यांच्या खाली असेल. महागाई ही चिंतेची बाब आहे, ज्याचा आम्ही प्रभावीपणे सामना करत आहोत,” असे ते म्हणाले.

अनेक पावले उचलली

ऑक्टोबर महिन्याची महागाईची आकडेवारी सोमवारी जाहीर होणार आहे. ते म्हणाले की, गेल्या सहा-सात महिन्यांत आरबीआय आणि सरकार या दोघांनी महागाई कमी करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. दास म्हणाले की आरबीआयने आपल्या बाजूने व्याजदर वाढवले आहेत आणि सरकारने पुरवठ्याशी संबंधित अनेक पावले उचलली आहेत.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.