DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

”मी उंच नाही, पण.. स्वतःच्या बॉडी पार्टबाबत अभिनेत्रीचं अतिशय बोल्ड वक्तव्य…

दिव्यसार्थी ऑनलाईन डेक्स : दिव्या दत्ताला तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाते. तिनं अनेक हिट चित्रपटांत काम केले आहे. तिला तिच्या उत्कृष्ट व्यक्तीरेखांसाठी ओळखले जाते. दिव्याने नुकताच आपला ४५ वा वाढदिवस साजरा केला आहे.

बॉलिवूडमध्ये नाव कमवायला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. दिव्याने जेव्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाय ठेवला तेव्हा तिला अनेक अडचणींना समोरे जावे लागले होते. पण आज तिनं जे काही नाव कमावलं आहे ते फक्त आणि फक्त स्व बळावर.

 

दिव्याने मुलाखतीत केला खुलासा

दिव्या दत्ता अलीकडेच 11 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या अँथ द एंड या चित्रपटात दिसली होती. दिव्या म्हणाली “मी यापूर्वी अनेक चुका केल्या आहेत. माझ्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मला बर्‍याच गोष्टींसाठी बोलण्यात आले होते. मी उंच नाही पण मी बस्टी आहे. त्यामुळे सुरुवातीला कठीण होते. पण हळूहळू तुम्हाला तुमचा मार्ग सापडतो,” दिव्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले.

दिव्याने साकारलेल्या दमदार भूमिका

दिव्याने हिरोईन (2012), वीर-जारा (2004), भाग मिल्खा भाग (2013) आणि दिल्ली-6 (2009) सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. दिव्याचा शेवटचा चित्रपट अँथ द एंड मध्ये मुकुल देव, देव शर्मा, समिक्षा बटनागर, दीपराज राणा, युगांत बद्री पांडे आणि अरुण बक्षी हे देखील होते. केएस मल्होत्रा ​​यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट तुरुंगातून पळून जाणाऱ्या सीरियल किलरभोवती फिरतो.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.