DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी! आत्महत्या करण्यास गेलेल्या महिलेचे वाचवले प्राण

जळगाव : शहरातील मेहरूण तलाव येथे मानसिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या एका ३४ वर्षीय विवाहित महिला जीवनाला कंटाळून आत्महत्या करण्यास निघाली असता नागरिकांनी तात्काळ ११२ क्रमांकावर समपर्क साधून एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी कार्यतत्परतेने धाव घेऊन महिलेस आत्महत्या करण्यास परावृत्त केल्याने एमआयडीसी पोलिसांचे नागरिकांनी कौतुक केले आहे. याबाबत माहिती अशी कि,

सोनाली वय- 34 वर्ष, रा. गणेश नगर, जिल्हापेठ, ह्या जळगाव शहरातील मेहरूण तलाव येथे जीवनाला कंटाळून आत्महत्या करण्यास जात असताना लोकांनी तात्काळ याची खबर ११२ क्रमांकावर डायल करून पोलिसांना दिली . याची दखल घेत एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोहेकॉ नितीन पाटील,चंद्रकांत पाटील व महिला पोलीस कॉ सपना येरगुंटला यांनी सदर सोनाली यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात सुखरूप दिले .

दरम्यान सोनाली या महिला मेहरूण येथे आत्महत्या करण्यास गेली असता स्थानिक लोकांनी डायल 112 ला कॉल करून हि माहिती एमआयडीसी पोलिसांना कळविल्याने तात्काळ पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेत सदर महिलेला आत्महत्या करण्यापासून रोखले. . महिलेला पोलीस ठाण्यात आणले असता तिची विचारपूस केली असता ती मानसिक दृष्ट्या कमकुवत असल्याचे समजल्याने महिलेस पोहेकॉ नितीन पाटील,महिला पोलीस कॉन्स्टेबल सपना येरगुंटला , आदींनी महिलेच्या नातेवाईकाचा शोध घेऊन तिची आई व मावशी – सत्यभामा संतोष पाटील, क्यू- 65 वर्ष, स. गणेश नगर, .यांच्या ताब्यात सुरक्षित देण्यात आले असून एमआयडीसी पोलिसांच्या या कार्यतत्परतेचे नागरिकांनी कौतुक केले आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.