DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

रावेरमधून श्रीराम पाटीलांना शरद पवार गटाची उमेदवारी जाहीर

जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या तारखा आता जवळ येऊन लागल्या असून मात्र राज्यातील महाविकास आघाडीकडून जागा वाटपाचा तिढा सुटत नव्हता. मात्र आता हा तिढा सुटला असून आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभेच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली. यात सातारा आणि रावेरच्या जागेचा समावेश आहे. रावेरमधून श्रीराम पाटील यांनी संधी देण्यात आलीय.

एकनाथ खडसे यांनी ऐन निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. शरद पवार यांच्याकडून खडसेंना उमेदवारी देण्याबाबत हालचाली सुरु होत्या. पण खडसेंनी नकार दिला. त्यामुळे शरद पवारांकडून इच्छूक उमेदवारांची चाचपणी कऱण्यात येत आहे. रवींद्र पाटील आणि श्रीराम पाटील यांची नावं आघाडीवर होती. अखेर आज श्रीराम पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. रावेरमधून भाजपनं रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. रावेर मतदारसंघात रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील असा सामना होणार आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.