DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

आई समोरच मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू

जळगाव |  मावशीच्या घरून आईसोबत परत येत असताना तरुणाचा आईसमोरच धावत्या रेल्वेतून पाय घसरुन पडल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रणव विजय बारी असे मृत तरूणाचे नाव आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, प्रणव बारी हा आई-वडिलांसह प्रिंप्राळा भागातील गांधी चौकात वास्तव्याला होता. सध्या तो पुण्यातील सिंहगड कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. नातेवाईकाच्या लग्नासाठी काही दिवसांपूर्वी प्रणव हा जळगावात घरी आलेला होता.

शुक्रवारी प्रणव व त्याची आई ज्योती बारी असे दोघेही भुसावळ येथे मावशीकडे भेटण्यासाठी गेलेले होते. मावशी व मावस भावाला भेटून रविवारी सकाळी ७ वाजता प्रणव हा आईसोबत जळगाव येथे येण्यासाठी भुसावळ मेमू रेल्वेत बसला होता. आई ज्या सीटवर बसली होती, त्या सीटसमोरच असलेल्या दरवाजात प्रवण हा उभा होता. मेमूने भुसावळ स्टेशन सोडल्यानंतर काही अंतरावर प्रणवचा तोल गेल्याने तो धावत्या रेल्वेतून आईच्या डोळ्यादेखत खाली पडला.आणि आईने जागीच टाहो फोडला.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर ज्योती बारी यांनी आरडाओरड केली. त्यांच्या आवाजाने प्रवाशांनी रेल्वेची चेन ओढून रेल्वे थांबवली, त्यानंतर ज्योती बारी यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. माहिती मिळाल्यानंतर भुसावळ येथे राहणाऱ्या ज्योती यांच्या बहिणीचा मुलगा राकेश याने घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत प्रणव याला खासगी रूग्णालयात हलविले. या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. मुलाच्या मृत्यूमुळे आई ज्योती बारी यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.