DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

रेल्वे टॉवर वॅगनने चार कर्मचार्‍यांना चिरडले, चौघे कर्मचारी जागीच ठार

 

नाशिक : प्रतिनिधी 

लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे इलेक्ट्रिक लाईनचे काम करणार्‍या चार कर्मचार्‍यांना चिरडल्याची संतापजनक घटना सोमवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या चतुर्थ श्रेणी रेल्वे कर्मचार्‍यांनी रेल्वेच्या चालकावर हल्ल्याचा प्रयत्न केला तर पोलिसांनी रेल्वे चालकाला सुरक्षितपणे अन्य ठिकाणी हलवले असून या घटनेच्या निषेधार्थ संतप्त कर्मचार्‍यांनी रेल रोको आंदोलन सुरू केले आहे.

 

चौघे कर्मचारी जागीच ठार :  दोन डब्यांची रेल्वे टॉवर ही लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ सकाळी सहा वाजता उभी होती व टॉवर गाडीला लासलगावहून पुन्हा उगावच्या दिशेने काम करण्यासाठी रेल्वे पोल नंबर 230 /231 च्या दरम्यान काम करायचे होते. या ठिकाणी रेल्वेचे ट्रॅकमेन काम करीत असतानाच टॉवर गाडी ही डाऊनलाईननेच उगाव दिशेकडे गेल्याने या कर्मचार्‍यांना काही समजायच्या आत गाडीने त्यांना चिरडले. त्यामुळे चौघे कर्मचारी जागीच मयत झाले.

 

या कर्मचार्‍यांचा ओढवला मृत्यू : या दुर्घटनेत संतोष भाऊराव केदारे (38), दिनेश सहादु दराडे (35), कृष्णा आत्माराम अहिरे (40), संतोष सुखदेव शिरसाठ (38) यांचा मृत्यू ओढवला असून हे कर्मचारी ट्रॅक मेंटनर या पदावर कार्यरत असल्याची माहिती आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.