DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

१३ ऑगस्ट रोजी ८ केंद्रावर तलाठी, कोतवाल पदांसाठी परीक्षा

जळगाव;- जिल्हा प्रशासनाच्या वतीने १३ ऑगस्ट २०२३ रोजी पोलीस पाटील व कोतवाल रिक्त पदांसाठी जळगाव जिल्ह्यातील ८ परीक्षा केंद्रावर सकाळी ११ ते दुपारी १२.३० व दुपारी ३ ते ४ यावेळेत परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अशी माहिती उपविभागीय अधिकारी महेश सुधळकर यांनी दिली आहे.

परीक्षा केंद्र परिसरात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) (२) चे मनाई आदेश जिल्हादंडाधिकाऱ्यांनी लागू केले आहेत. परिक्षा केंद्राजवळच्या ५० मीटरच्या आतील परिसरातील सर्व झेरॉक्स दुकाने हे वर परीक्षा कालावधीत पेपर सुरु झाले पासून ते पेपर संपेपर्यंतच्या बंद ठेवणेत राहतील.

 

सकाळ सत्रात‌ पोलीस पाटील व दुपार सत्रात कोतवाल या पदासाठी परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. प्रतिबंधात्मक आदेश परीक्षार्थी, नियुक्ती अधिकारी -कर्मचारी, पोलीस, होमगार्ड यांच्या साठी लागू होणार नाही. असे ही श्री.सुधळकर यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.