DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

कोठारी क्लासेसमधील विद्यार्थ्यांला अर्धनग्न करून मारहाण !

जळगाव –  खासगी क्लासचा होमवर्क न केल्याने एका नऊ वर्षाच्या बालकाला शिक्षिकेने अर्धनग्न करून मारहाण केल्याचा भयंकर प्रकार शुक्रवार २ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता बळीरामपेठ येथील कोठारी क्लासेसला घडला आहे. याबाबत शिक्षिकावर शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय.

शनीपेठेतील गुरूनानक नगरातील रहिवाशी योगेश गणेश ढंढोरे (वय-३७) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचा ९ वर्षाच्या मुलाला बळीरामपेठ येथील कोठारी क्लासेस येथे खासगी क्लास लावलेला आहे. या ठिकाणी पल्लवी जितेंद्र इंदाणी रा. मगर पार्क वाघ नगर या शिक्षिका म्हणून नोकरीला आहे. दरम्यान, ढंढोरे यांच्या मुलाने क्लासमध्ये दिलेला अभ्यास केला नाही. म्हणून शिक्षीका पल्लवी इंदाणी यांनी त्याला शर्ट काढून मारहाण केली तर क्लास संपेपर्यंत इतर विद्यार्थ्यांसमोर उभे करून ठेवले होते, अशी लेखी तक्रार पालक योगेश ढंढोरे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी २ सप्टेंबर रोजी शिक्षिका पल्लवी इंदाणी यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहे.

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.